निरूपण
माझिया जातीचा मज भेटो कोणी ।
आवडिची धनी पुरवावया ।।
माझिया जातीचा मजशी मिळेल ।
कळेल तो सर्व समाचार ।।
संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे ।
येर गबाळाचे काम नाही ।।
आपण जे काही करतो, जसे वागतो, जे इच्छितो ते सर्व आपणास त्यांच्याकडून अपेक्षित असते जो आपल्याप्रमाणेच सर्व करू इच्छितो वा सर्व जाणून अनुभाविक आहे. आपणास किराणा माल हवा असल्यास आपण कपड्याच्या दुकानात जात नाही तर किराणा दुकानातच जातो. संताजी महाराज हे ईश्वर कृपाभिलाषी होते. त्यांना ईश्वर भेटीची तळमळ होती. ईश्वर भेटीची तळमळ झेललेला व ईश्वर भेट घेतली असा व्यक्ती भेटल्याशिवाय ईश्वर प्राप्ती नाही. असा व्यक्ती कोण तर सद्गुरू हे एकमेव होय. कारण शिष्याचे कल्याण हे सद्गुरू शिवाय अन्य कोणी करू शकत नाही. म्हणून संताजी महाराजांना सद्गुरू प्राप्ती, कारणपरत्वे, ईश्वर प्राप्त करून देण्यासाठी गुरू प्राप्तीची तळमळ होती. त्यांनी त्यांच्या या अवस्थेत असताना हा अभंग लिहिला असावा. म्हणून म्हणतात *"माझिया जातीचा मज भेटो कोणी ।आवडिची धनी पुरवावया ।।"* याठिकाणी अभंगात वापरण्यात आलेली जात ही आज प्रचलित असलेल्या जाती अपेक्षित नाही व ते संताना अभिप्रेत नाही. आज समाजात जातीचा स्तोम फार माजला आहे. प्रत्येक मनुष्य स्वस्थानी श्रेष्ठ असतो. त्यामुळे दुसरा कसा वागतो व काय करतो, हे पहाण्याची गरज नाही. इतर कसे वागतात, काय करतात, याचे निरिक्षण करीत राहणेणे वा त्यांना दोष देत राहणे, म्हणजे स्वतःच्या आचरणावर शंका घेणे वा स्वतःच्या आचरणात स्वतः दोष पाहणे होय. स्वतःतील दोष पाहणे, हे उत्तम आहे. पण तसे दोष पाहिल्यावर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न होत असल्यास ते उत्तम ठरते. जर दोष ते दोष नसून आपण जे करतो ते उत्तम म्हणत राहिल्यास चूकीचे ठरते. कारण इतरांच्या नैतिक आचरणात दोष पाहिल्यास दृष्टी दोषी होतेच होते व आपले नैतिकता ढळून अशुद्ध आचरण शुध्दतेच्या नावाने चालू राहते, यात स्वघात होतो. यापेक्षा इतरांकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे पाहत राहिल्यास दोष लागणार नाही व कालांतराने नकळत असलेले किरकोळ दोष दूर होत जाऊन आचरण शुध्द होईल. म्हणजे त्यावेळी जन्माला चिकटलेली तथाकथित जात मग सनातन जातीत म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठीच जन्माला घातलेली जात हीच मनुष्य जात हे लक्षात येईल व ईश्वर प्राप्ती तळमळ येईल, हेच संत आपल्या अभंगातून सांगत आहेत.
"ज्याच जळतं त्यालाच कळतं" अशी म्हण आहे. तशी ही म्हण एखादी वाईट प्रसंगाने असह्य त्रास होताना त्याला ते निर्दयी सहन करण्यास सांगतात तेव्हा वापरली जाते. पण त्या म्हणीतील शब्द न पाहता त्यातील आशय पहावे. ज्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव असेल तेव्हा पुन्हा तसा प्रसंग घडला असता त्यास त्यातील मर्म कळेल, हा आशय आहे. म्हणजे इथे अनुभवाला महत्त्व दिले आहे. इथे संतु महाराजांना तेच दर्शवायचे आहे. "माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।।" म्हणजे ज्याने ईश्वर प्राप्तीची तळमळ सहन केली व त्या तळमळीतून त्याला तो प्राप्त झाला, अशा व्यक्ती वा सिध्द पुरूषांच्या शोधात महाराज होते. त्यांना सिध्द पुरूष भेटीचीच तळमळ होती, हे निश्चित. कारण त्यांना त्या सिद्ध पुरूषांकडून समाचार हवा होता. ज्याला माहिती व अनुभव आहे तोच समाचार देऊ शकतो. समाचार म्हणजे ईश्वर प्राप्तीचा सखोल मार्ग व त्याचे रूप, गुण विशेषण वगैरे. कारण ईश्वर भेटला तर त्याला ओळखणार कसा. म्हणून सिद्ध पुरूष म्हणजेच सद्गुरूचा शोध महाराजांना होता. म्हणून म्हणतात "माझिया जातीचा मजशी मिळेल ।
कळेल तो सर्व समाचार ।।".
"संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।।" इथे पाहिजे जातीचे म्हणजे अन्य काही नसून ते ज्या गोष्टीसाठी धडपडत वा प्रयत्नात होते, तशीच धडपड व प्रयत्न करून तीच गोष्ट ज्याने प्राप्त केले तो होय. ईश्वर प्राप्ती हा विषय नसल्याने त्याला मोबदला देऊन प्राप्त करता येत नाही. ईश्वर प्राप्तीसाठी षड़़्रिपू वर विजय प्राप्त करून निष्काम व निरपेक्ष भाव धारण करून साधनेत रत होणे आवश्यक आहे. दृश्य संसारात रममाण झालेल्या व्यक्तीला अव्यक्त संसार विरहीत दुनियेत रत होणे महाकठीण आहे. नामसंकीर्तनाने ईश्वर प्राप्ती होत असली तरी नामसंकीर्तन हे ईश्वर प्राप्तीची तळमळ निर्माण करताना माणसाला वासना विरहित करून वैराग्य मार्गावर घेऊन जाते. त्यावेळी सर्व षड़़्रिपू गळून पडतात व ईश्वर प्राप्ती शिवाय अन्य कोणतीही विषय कामना व भाव शिल्लक राहात नाही. ईश्वर विषय नसल्याने ती कामना व भाव हे अनुक्रमे निष्काम व निरपेक्ष होतात. पण ईश्वर प्राप्ती तळमळ हे अंतरंगातून व ह्रदयातून हवी. शिवाय प्राप्तीचा निश्चय व संकल्प हवा. प्रत्येक माणसाला हे शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात "संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।।". अध्यात्म विषयावरची पुस्तके वाचून, वेद, उपनिषदातील मंत्र स्तोत्र वाचून, ते मुखोद़़्गत करून, उपवास वा वार करून ईश्वर प्राप्ती नाही. हे सर्व ईश्वर प्राप्ती मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी वाटाड्या आहेत व त्याची सोबत करून स्वाध्याय, भक्तीयोग, नामसंकिर्तन आवश्यक आहे. त्यासाठी कठोर नामसंकीर्तन व साधना हवी. शिवाय ईश्वर प्राप्तीची आर्त तळमळ असणारा म्हणजेच साधक जातीतील व्यक्ती यांनाच ते शक्य आहे, अन्य लोकांना नाही, हे महाराज सांगत आहेत.
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
ॐ गुरूदेव कहे एक ! सिर्फ आत्माही मालिक !!