#निरूपण
मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||
थोर नवलाव झाला | वांझे पुत्र प्रसवला ||
विंचु पाताळासी जाय | शेष माथा वंदी पाय ||
माशी व्याली घार झाली | देखोनी मुक्ताई हासली ||
मानवी मनाची या जगासंबंधी भ्रामक अवस्था व ती भ्रामकता दूर होताच, मनुष्य स्वतःला वेडा समजतो व आपल्याच या अवस्थेवर त्याला कीव येते व विस्मयक होऊन स्वतःला माफ करताना स्वतःचीच लाज वाटते, हा भाव "मुंगी उडाली आकाशी |" या अभंगात मुक्ताईने सहज सांगितले आहे. तिने हे सांगताना तिला आलेला अनुभव कूट करून सांगितले आहे. त्यातील सांगितलेला प्रत्येक प्रसंग हा एक एक अवस्था उलगडत जातो. हे सर्व रूपकात्मक अनेक प्रतीके वापरून मुक्ताई सांगते.
खरे पहाता संतानी कोणता अभंग लिहिताना मनात कोणता भाव धरून लिहिला याचा उलगडा तेच करू जाणे. पण संताचे इतर अभंग वाचून व त्यांची लिहिण्याची पध्दती पाहून त्यांचा मनात कोणता अभंग लिहिताना काय भाव असेल, याचा फक्त अंदाजच बांधता येईल. मुक्ताई आपल्या अन्य अभंगात म्हणते *"सर्वत्र रुपडे भरलेसे दृष्य। ज्ञाता ज्ञेय भास हरिमाजी॥ मुक्ताई साधनरुप हरि चित्ती। संसारसमाप्ति हरिच्या नामे॥.* यावरून हे स्पष्ट होते मुक्ताई ही भवबंधनातून मुक्त झाली होती. मुक्ती अनुभवत असताना तिला अनेक अनुभव येत गेले. मायेचा खेळ कसा चालतो व मुक्तीपूर्वी मनुष्यात भ्रम कसा निर्माण होत असते, याचा अनुभवास येत होते. तोच अनुभव शब्दात विणण्याचा प्रयत्न तिने केला आहे.
मग प्रश्न येतो अशा कूट रचना का केल्या. भ्रम हा स्वप्नवत व कूट असतो. भ्रम कोणत्या गोष्टीला कोणत्याही स्वरूपात व्यक्त करातो. पण भ्रम हे मन, चित्त, बुद्धी व ज्ञान अन् वासना याच्याशी निगडीत आहे. भ्रमात त्यांची अवस्था काय होते, हे सांगताना झालेला शब्द प्रयोग कूट वाटतो. जर एखादी वस्तू खायचा असल्यास खाणाऱ्यांचे वदन व मुख हे त्या वस्तूपेक्षा मोठे असणे आवश्यक आहे. इवलुशी मुंगी संपूर्ण आकाशाला व्यापून टाकली. कारण तिला सुर्याला गिळायचे आहे. सुर्यापेक्षा मोठे होणे आवश्यक आहे. मुंगीने सूर्यच गिळला आहे. यातील मुंगी म्हणजे मन व सुर्य म्हणजे ज्ञान होय. आकाश म्हणजे व्यापलेली बुध्दी. दृश्य गिळण्याची प्रक्रिया म्हणजे संसार वा माया होय. दृश्य ते माया, अदृश्य ते सत्य. सत्य हा मायेच्या गर्तेत असतो. कारण मायेला सत्य फार आवडते व त्याला स्वतःच्या स्वाधीन ठेवण्यासाठी माया दृश्य होऊन भ्रम निर्माण करीत असते व मानवी बुध्दी भ्रमाच्या अधिन होऊन भरकटत असते. तुम्ही आज इथे आहात. जर तुम्हाला दिल्लीला जायचे असेल तर प्रथम एका क्षणात तुमचे मन दिल्लीला पोचणार व त्यानंतर तुमचा देह तिथे जाणार. मग पहा मानवी मन जवळ असताना मुंगीसम व विचार येताच कुठेही जाते. ज्ञानप्रकाश हा सत्य आहे व तो सुर्याइतका स्पष्ट आहे. पण चंचल बुध्दी सर्वत्र व्यापून आहे. कोणत्या गोष्टीला ती कोणत्या स्वरूपात स्वीकारेल वासना व स्वाच्छंद मनाच्या प्रवासावर अवलंबून आहे. तिला स्वातंत्र्य नाही. म्हणून सत्यापासून दूर असलेले मुंगीसम मन हे बुध्दीला चंचल बनवून अवकाशात भरकटत जाते व दृश्य मायेच्या अधीन होऊन सत्य म्हणजे ज्ञानाला झाकून टाकते. तिथे ती स्वतःचेच अस्तित्व दाखवित रहाते.
पृथ्वी पाण्यावर आहे का पाण्यावर पृथ्वी आहे. पाण्याने भरलेले भांडे कलल्यावर पाणी सांडते. मग पृथ्वीवरील पाणी कशात आहे. पृथ्वी फिरते तर मग पाणी का सांडत नाही. असे अनेक प्रश्ने अनेकांच्या मनात येत असतात. ते येणे स्वाभाविक आहे. कारण ही विचार प्रक्रिया आहे व ते मन बुध्दीच्या स्वाधीन आहे. दरी, डोंगरातून, जमीनीतून पाणी येते. आकाश मार्गाने पुन्हा पाऊस होऊन जमीनीवरच पडते. पाणी येथून कुठेही जात नाही. तरीही दुष्काळ पडतो. पण थोडा आभ्यासाचा भाग बाजूला सारून बालबुध्दीने वा अज्ञान समजून विचार केला तर हे सर्व नवल आहे की नाही. आभ्यास नाही वा ज्ञान नाही म्हणजे वांझ व मनबुध्दीच्या प्रक्रियेत वांझेच्या ठायी माहिती व ज्ञान येत चालले. पुत्र प्रसवला म्हणजे ज्ञान प्राप्त झाले. म्हणून हा नवल आहे.
आभ्यास व योग याच्या सहाय्याने चित्तात सत्यप्रकाश पडतो. याठिकाणी मुक्ताईने चित्ताला विंचु संबोधले असल्याचे दिसते. कारण विंचु हा उघड्यावर फिरत नाही. तो दगड, माती, जमीनीतील बिळ याचा आश्रय करून रहातो. त्याठिकाणी त्याला सुरक्षितता व मुक्ती आहे. म्हणून पाताळाशी जाय म्हंटले असावे. चित्त हा विंचवाप्रमाणे पाताळाशी म्हणजे ज्ञानाच्या खोलीत जाईल व सत्य जाणेल तेव्हा शेष कांहीच रहात नाही. दृश्य सोडून जे कांही शेष असेल ते नतमस्तक होत स्वतःहुन सामोरी येईल म्हणजे याचाच अर्थ शेषनाग रूप कुंडलीनी जागृत होऊन योग्याच्या अधीन होईल, असे मुक्ताईला सांगायचे आहे, असे वाटते.म्हणून म्हणते "शेष माथा वंदी पाय ||".
एखादी किरकोळ गोष्ट फार कठीण वाटते, पण जे ती गोष्ट सहज करता येते, असे समजल्यावार आपण त्यासाठी विनाकारण किती कष्ट घेतले व इतर त्यावर हसत होते, हे पाहून वा याची आठवण झाल्यावर आपण स्वतःची ती दीन अवस्था स्वतः स्वतःवरच हसतो. शिवाय ते दोन गोष्टींसाठी असते. पहिले म्हणजे ती कृती. दुसरी म्हणजे आपणास तितके किरकोळ ज्ञान वा माहिती देखील नव्हती, याची कीव येऊन. तसेच इथे आहे. मन, चित्त, बुद्धी, ज्ञान अन् वासना हे एकमेकांवर अवलंबून असले तरी ते स्वतंत्रपणे कार्य करीत असतात. जेव्हा हे सर्व एकरूप होतात तेव्हा त्यालाच योग म्हणतात. माशी दिसायला साधी पण तिला गंध ज्ञान फार आहे. ती गुळावर, घाणीवर, अन्नावर, वगैरे कोणत्याही पदार्थावर तितक्याच तावातावाने फिरत असते व ग्रहण करीत असते. शिवाय तिचे भ्रमण हे तितकेच असते. मन, चित्त, बुद्धी ज्ञान व वासना यांना स्वंतत्रपणे घेऊन फिरणारी या माशीरूप मानवी देहात योगज्ञान उत्पन्न करून घारीप्रमाणे संपूर्ण अवकाशात भ्रमण करू लागते. त्याला सत्य अवघत झाल्यावर संपूर्ण ब्रह्मांड एकरूप एकजीव दिसतेच, पण समदृष्टीही प्राप्त होते. म्हणजेच सत्य ज्ञान होते व जीवाला मुक्त करते. माया गळून पडते. जेव्हा मुक्ती प्राप्त होते त्यावेळी कठीण वाटणारे मायेचे जंजाळ फारच क्षुल्लक आसल्याचे व ते संसाराच्या अधीन असल्याने कठीण भासत होते, अशी त्याच्यातील क्षुल्लकता पाहून आपणालाच हसू येते. याची कारणे मुक्ताई म्हणते "देखोनी मुक्ताई हासली ||"
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
#ॐ_गुरूदेव_कहे_एक ! #सिर्फ_आत्माही_मालिक !!

No comments:
Post a Comment